केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र! महाराष्ट्रातच होतोय कारवायांचा धडाका, काय आहे यामागचं कारण?
गणेश ठाकूर, एबीपी माझा | 08 Jul 2021 11:03 PM (IST)
केंद्रीय तपास यंत्रणेची करडी नजर महाराष्ट्रातल्या नेत्यांवर पाहायला मिळते. खास करून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडी कडून समन्स बजावण्यात आले आहेत. तर अजूनही काही नेते तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. कोणत्या नेत्यांवर काय आरोप आहेत. तसेच आतापर्यंत या नेत्यांवर काय कारवाई करण्यात आली याबाबत घेतलेला हा मागोवा.