Remdesivir पुरवठा 10,000ने घटवला,केंद्राचा महाराष्ट्राबाबत दुजाभाव?मागणी 60,000 मग पुरवठा 26,000 का?
रौनक कुकडे | 22 Apr 2021 09:08 PM (IST)
केंद्राने राज्याला दिलेल्या रेमडेसिवीरवरून राज्य सरकारची अन्यायाची भावना आहे. यासंदर्भात राज्य सरकार केंद्राला पत्र लिहिणार असल्याची माहिती आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्ण आणि त्यातील 10 ते 15% रुग्णांना रेमडेसिवीरची गरज असते. त्यामुळे राज्याला दर दिवशी 60 हजार रेमडेसिवीर मिळाले पाहिजे अशी राज्याची मागणी आहे. केंद्राने राज्याला दिलेल्या पुरवठ्याबद्दल पुनर्रविचार करावा, अशी मागणी या पत्राद्वारे राज्य सरकार केंद्राकडे करणार असल्याची माहिती आहे.