शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार कर्ज का काढत नाही? केंद्र सरकार राज्याचा थकीत GST का देत नाही?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Oct 2020 02:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App"ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र आठ दिवस झाले, नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलेलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोणालाही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांकडून राजकीय स्टेटमेंटची अपेक्षा नाही. सरकारचा नाकर्तेपण झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचा वर्षभरापूर्वीचा व्हिडीओही दाखवून त्यांनी घेतलेल्या भूमिकेची आठवण करुन दिली.