Meera Chopra : नियम मोडून मॉडेल मीरा चोप्राने लस घेतली? मॉडेलसह लस देणाऱ्यांवर कारवाई होणार? ठाणे
अक्षय भाटकर, एबीपी माझा | 30 May 2021 11:09 PM (IST)
ठाणे : मीरा चोप्रा या अभिनेत्रीला सुपरवायजरचे ओळखपत्र देऊन पालिकेच्या केंद्रात लस देण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश ठाणे पालिका आयुक्तांनी दिले आहेत. एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुठवडा जाणवत असून ठाणेकर नागरिकांना लस मिळले मुश्कील झाले असताना दुसरीकडे नोंदणी न करता नियम डावलून एका महिला सेलिब्रिटीने लस घेतल्याचे उघड झाले आहे. ठाणे पालिकेच्या पार्किंग प्लाझा येथे असलेल्या रुग्णालयात ही लस देण्यात आली.