Kangana Ranaut: आता इन्स्टाग्रामवरूनही कंगना आऊट? कंगनाने केलेली पोस्ट इन्स्टाग्रामने का केली डिलीट?
एबीपी माझा वेब टीम | 10 May 2021 11:13 PM (IST)

मुंबई : कंगना रनौतला आता ट्विटरपाठोपाठ इन्स्टाग्रामचाही फटका बसला आहे. कंगनाच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर ट्विटरने तिचं अकाऊंट सस्पेंड केलं होतं. त्यानंतर त्यावर संताप व्यक्त करताना, व्यक्त व्हायला आणि आपल्या सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी इतर व्यासपीठंही आहेत. आपण तिथे आपल्याला वाटतं ते बोलत राहू असं म्हटलं होतं. त्यानुसार कंगना तातडीने इन्स्टाग्रामवर आली.