अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ? देशमुखांच्या जवळच्या भटेवारा, आयझॅक्स कुटुंबियांकडे का पोहोचली ईडी?
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर | 25 May 2021 11:05 PM (IST)
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ? देशमुखांच्या जवळच्
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तीन व्यक्तींच्या ठिकाणांवर आज प्रवर्तन निर्देशालय म्हणजेच ईडीने छापे टाकले. नागपूरातील शिवाजीनगर, न्यू कॉलनी आणि जाफर नगर परिसरात एकाच वेळेस ईडीच्या विविध टिम्सनी ही कारवाई केली.
सर्वात पहिली कारवाई शिवाजीनगर परिसरात हरे कृष्णा अपार्टमेंटमध्ये करण्यात आली. हरे कृष्ण अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर सागर भटेवारा या व्यावसायिकाच्या सदनिकेत ईडीचे तीन अधिकारी चौकशीसाठी दाखल झाले. साडे सातला आलेले ईडीचे अधिकारी सव्वा अकराच्या सुमारास परतले. मात्र, या ठिकणी त्यांनी काय तपासले, कोणाची चौकशी केली याबद्दल कोणतीही माहिती ईडीकडून देण्यात आली नाही.
या भटेवारा, आयझॅक्स कुटुंबियांकडे का पोहोचली ईडी?