ऐन पावसाळ्यातच कारवाईचा घाट का? कारवाई करण्यामागचं कारण काय? ओढ्याच्या रुंदीकरणाने प्रश्न मिटणार?
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 24 Jun 2021 10:31 PM (IST)
पुणे : पुण्यातील आंबिल-ओढा परिसरातील पुणे महापालिकेने अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. ऐन पावसाळ्यात आणि कोरोना संसर्गात केलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईविरोधात आक्रमक झालेल्या काही स्थानिक नागरिकांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला. शिवाय पोलीस आणि स्थानिकांमध्ये झटापटही झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकामी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.