Mumbai : अनिल देशमुखांच्या चौकशीसोबत कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा तपास? काय आहे CBI चा प्लॅन ऑफ अॅक्शन?
गणेश ठाकूर, एबीपी माझा | 07 Apr 2021 12:59 AM (IST)
नवी दिल्ली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल झाल्या आहेत. एक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वतीने तर दुसरी राज्य सरकारच्या वतीनं आहे. देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करुन हे आरोप गुन्हा दाखल करण्यायोग्य आहेत की नाहीत याबाबत 15 दिवसांची मुदत हायकोर्टाने सीबीआयला दिली आहे.