Special Report : अमृतपाल सिंग संधू आहे तरी कोण?, 'वारिस पंजाब दे'चा पोलिस स्टेशनवर हल्ला
abp majha web team Updated at: 05 Mar 2023 07:18 PM (IST)
१९८०च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद फोफावला होता.. तब्बल १५ वर्षांनी मोठ्या मुश्किलीनं पंजाब शांत झालं.. मात्र आता खलिस्तानच्या घोषणा पुन्हा ऐकू येऊ लागल्या आहेत. अमृतपाल सिंग संधूू हा तरुण सध्या उघडपणे खलिस्तानची मागणी करतोय.. धक्कादायक म्हणजे ज्याच्यामुळे ऑपरेशन ब्लूस्टार करावं लागलं, त्या जनरल सिंह भिंद्रावालेला अमृतपाल आपला आदर्श मानतो. सरत्या आठवड्यात या अमृतपालनं धुमाकूळ घातला, आणि चंदीगडपासून दिल्लीपर्यंत या घटनेची दखल घेतली गेली. नक्की कोण आहे हा अमृतपाल सिंग संधू, जाणून घेऊयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये..