Prashant Kishor Special Report: अब की बार, खुद का प्रचार? प्रशांत किशोर केणत्या पक्षात जाणार?
abp majha web team | 02 May 2022 11:51 PM (IST)

काँग्रेसचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर नवी राजकीय इनिंग सुरु करण्याच्या तयारीत आहेत. प्रशांत किशोर नवा पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. निवडणूक रणनीतीकार म्हणून निवृत्तीची घोषणा केल्याच्या वर्षभरानंतर प्रशांत किशोर यांनी जनतेत जाणार असल्याचे ट्विट केलंय. बिहारमध्ये पक्ष स्थापन करुन राजकारण उतरण्याचे संकेत किशोर यांनी दिलेत.