BDD Chawl : बीडीडी चाळीतील स्थानिकांचं पुनर्विकासादरम्यान स्थलांतर कुठे? काय आहे या चाळीचा इतिहास?
निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई Updated at: 31 Jul 2021 09:50 PM (IST)
वरळी बीडीडी चाळीच्या भूमिपूजनात पोलीस परिवाराला हक्काचं घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे पोलिस परिवारात चैतन्याचं वातावरण आहे. या भूमिपुजनाच्या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच प्रत्येक पोलिस कुटुंब सहभागी होणार आहे, रांगोळी, दिवे, फुलांची सजावट ढोल ताश्यांच्या गजरात महिला फुगड्या घालून आपला आनंद साजरा करणार आहे.