Parambir Singh आहेत कुठे? परमबीर यांच्या मालमत्तांवर टाच येणार? परमबीर सिंह, उदय आणि अस्त!
abp majha web team | 18 Nov 2021 11:32 PM (IST)
मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना बुधवारी मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांना 30 दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या 30 दिवसात परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.