Woman Safety Special Report: महाराष्ट्रात महिला कधी सुरक्षित होणार? राष्ट्रीय महामार्ग असुरक्षित?
abp majha web team | 12 Dec 2022 05:28 PM (IST)

विरार येथे चालत्या कार मध्ये २१ वर्षीय महिलेवर झालेला विनयभंग आणि तिच्या ११ महिन्याच्या लहानग्या मुलीच्या हत्येप्रकरणी एबीपी माझाच्या बातमीनंतर आता पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी स्वतः येवून घटनास्थळ आणि आरोपी, फिर्यादीची तपासणी केली आहे. महिलेच्या तक्रारीनुसार मांडवी पोलिसांनी राञी उशिरा कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणाची चौकशी आता गुन्हे शाखे कडे वर्ग करण्यात आली असल्याच पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी स्पष्ट केलं आहे.