Theatre Reopen? कोरोनाच्या नियमातही रंगभूमी 'बॅकस्टेज'लाच? गार्डन,जिम सुरू, नाट्यगृह कधी उघडणार?
सौमित्र पोटे, एबीपी माझा | 03 Aug 2021 11:50 PM (IST)
राज्य सरकारची अनलॉकसंबंधीची नवी नियमावली काल जारी करण्यात आली आहे. 25 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये राज्यात वीकेंड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला आहे. परवा म्हणजे 4 ऑगस्टपासून ही नवी नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत.
राज्यातील अधिक रुग्ण संख्यांचा प्रमाण असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासन यावर ती निर्णय घेणार आहे.