ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर तोडगा कधी? बुधवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार
abp majha web team Updated at: 20 Dec 2021 10:42 PM (IST)
मुंबई : राज्यात गेल्या 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेने या संपातून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची आज बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे.