Mumbai Metro : Metro 3 चं कारशेड होणार तरी कुठे? मेट्रो कारशेडच्या जागेचा तिढा केव्हा सुटणार?
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई | 14 Jul 2021 12:06 AM (IST)

मुंबईत एकीकडे मेट्रो प्रकल्प पूर्ण होत असताना मेट्रो 3 लाईनच्या कारशेडच्या जागेबाबतची कोंडी सुटता सुटत नसल्याचं चित्र आहे. मेट्रो 3 कारशेडसाठी प्रस्तावित कांजूरमार्गची जागा न्यायालयीन कचाट्यात अडकल्याने आता पुन्हा एकदा या कारशेडसाठी पर्यायी जागांचा विचार करण्याचा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्प तयार होतोय पण कारशेडबाबतचा घोंगड अजूनही भिजत आहे.