Maharashtra School : शाळा सुरू करण्यावर सगळ्यांचंच एकमत, शाळा सुरू होणार पण कधी? Special Report
abp majha web team | 18 Jan 2022 10:34 PM (IST)

राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय. जिथे कोरोना रुग्ण नाहीत अशा ठिकाणी स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातल्या कोरोना स्थितीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देणार असल्याचंही टोपेंनी म्हटलंय. त्यामुळं बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत काय निर्णय होणार हे पाहावं लागेल.