धुळखात पडलेल्या पुस्तकांची पानं उघडणार कधी?बौद्धिक ताकद देणारी वाचनालयं आर्थिक गतेत | स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2020 05:24 AM (IST)
रत्नागिरी : 'वाचाल तर वाचाल' या शब्दांमध्येच सारं काही आलं. पुस्तकं, वाचन याबाद्दल कमीत कमी शब्दात व्यक्त होता येतं आणि त्याचं महत्व देखील कळतं. महाराष्ट्राला साहित्यसंपदेची, लेखकांची, कलाकारांची, संस्कृतीची एक वेगळीच देणगी लाभली आहे. अगदी श्रीलंकेतील सिंहली भाषेत देखील आपल्याला मराठी भाषेचे दाखले दिसून येतात. विपुल अशी साहित्यसंपदा लाभलेली भाषा म्हणजे मराठी. राज्यात विविध भाषांमधील साहित्य उपलब्ध असलेली ग्रंथालयं देखील मोठ्या संख्येनं आहेत. गाव-खेड्यांमध्ये देखील छोटी- छोटी वाचनालयं आहेत. पण, यासाऱ्यांसमोर सध्या आव्हान, समस्या आणि संकटं उभी राहिली आहेत.