HSC : बारावीच्या परीक्षांना दुसरा कोणता पर्याय आहे? परीक्षेआधी प्रत्येक विद्यार्थ्याचं लसीकरण होणार?
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
23 May 2021 10:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : सीबीएसई बारावीच्या परीक्षेसंदर्भात व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षांबाबत आज केंद्र आणि राज्यातील मंत्र्याची उच्चस्तरीय बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, प्रकाश जावडेकर यांच्यासोबतच राज्यांचे शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. बैठकीनंतर, 'विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि तिच प्राथमिकता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून परीक्षांसंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ' , अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.