Vaccination For All : 1 मेपासून लसीकरण कसं होणार? लसीकरण मोहिमेत कोणत्या कंपनीकडून लसींचा पुरवठा?
एबीपी माझा वेब टीम | 20 Apr 2021 11:00 PM (IST)

मुंबई : 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना सरसकट लसीकरणाची परवानगी देण्यात आलीय. मात्र, हे लसीकरण वेगानं करायचं असेल तर लसीचा पुरवठा देखील तितक्याच वेगानं व्हायला हवा. महाराष्ट्र सरकार आणि टास्क फोर्सकडून लसीकरण मोहिमेसाठी आता मेगाप्लान बनवला जातोय. लसीकरणाचं दरदिवसाचं टार्गेट काय असेल? कोणत्या कंपनीकडून लसीचा किती प्रमाणात पुरवठा व्हायला हवा याचं नियोजन पुढच्या काही दिवसांतच पूर्ण होईल.