Rahul Narvekar Special Report : राहुल नार्वेकरांच्या विधानाची चर्चा,निर्णय क्रांतीकारी, कुणाला भारी?
abp majha web team | 08 Jun 2023 09:44 PM (IST)
गेल्या दहा महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकारण नवनव्या शब्दांभोवती फिरतंय... बंड, उठाव, झाडी, डोंगार, खोके, गद्दार आणि सत्तासंघर्ष... यांसारख्या शब्दांचा वापर झालाच, पण तो होताना महाराष्ट्राने कधीही न पाहिलेला सत्तेचा सारीपाट मांडला गेला... मात्र या शब्दांची गाडी आता येऊन ठेपलीय, क्रांतिकारी या शब्दावर... आणि तो वापरलाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी... तेच नार्वेकर, ज्यांच्या हातून महाराष्ट्राच्या या सत्तासंघर्षाचा शेवट होणारेय... पाहूयात... त्यांनी वापरलेल्या क्रांतिकारी शब्दाचं मर्म आणि गर्भित अर्थ...