Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक घटना घडणं, ही बाब आता नवी राहिलेली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेला नुकत्याच बसलेल्या धक्क्यांनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं सर्वांच्या नजरा वळल्यात. अर्थात, ही चर्चा आमदार किंवा खासदार फुटण्याची नाही, तर थेट एनडीए सरकारमध्ये सहभागी होण्याबाबतची आहे. ही चर्चा नेमकी का सुरु झाली आणि त्यावर समोर येणाऱ्या प्रतिक्रिया नेमकं काय सांगतायत, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर आली..
आणि राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या कुजबुजीचं रुपांतर उलटसुलट चर्चेत झालं.
मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्यामुळं शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीसोबत जाण्याच्या पर्यायाची चाचपणी तर करत नाहीय ना.. या चर्चेनं जोर धरला.
अर्थात, सुप्रिया सुळे ‘ऑन रेकॉर्ड’ या बैठकीबाबत माहिती नसल्याचं सांगत असल्या तरी अशा भेटीगाठी नॉर्मल असल्याचंही सांगतायत.
All Shows
































