Wardha Road Damage Special Report : कोट्यावधींचा खर्च करुनही वर्ध्यात वर्षभरात रस्त्याचे तीन तेरा
abp majha web team | 10 Nov 2022 09:33 PM (IST)

वर्ध्यात शासनाने दोन कोटींचा रस्ता बनवला आणि वर्षभरातच हा रस्ता खड्ड्यात गेला. आर्वी तालुक्यातल्या या रस्त्यामुळे रस्ते घोटाळा समोर आलाय. एकदा रस्ता बनवला तर किमान काही वर्ष तो नीट राहणं अपेक्षित असतं पण इथे तर रस्त्याला वर्षपण झालं नाही आणि रस्तावरचं डांबर निघालंय. पाहूया काय स्थिती आहे तिथल्या रस्त्यांची