✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Agarwal Chhota Rajan Special Report : नवा बॉम्ब, राजनशी संबंध; अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्लड कनेक्शन!

abp majha web team   |  22 May 2024 11:33 PM (IST)

Pune Porsche Car Accident : पुण्यात पोर्शे कारने दोन इंजिनिअर्सना रस्त्यावर चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या (Pune Porsche Car Accident )आजोबाने 2009 मध्ये भावासोबत मालमत्तेच्या वादात डॉन छोटा राजनची मदत घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तत्कालीन नगरसेवक अजय भोसले (Ajay Bhosale) यांच्या हत्येची सुपारी डॉन छोटा राजनला भावंडांमधील वाद मिटवण्यासाठी देण्यात आल्याचे समोर आलं आहे. सुरेंद्र कुमार अग्रवालने डॉन छोटा राजनला तत्कालीन नगरसेवक अजय भोसले यांची 2009 मध्ये हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. 


मैत्रीच्या संबंधातून अनिल भोसलेंवर गोळीबार


11 नोव्हेंबर 2009 रोजी सकाळी साडेदहा वाजता तत्कालीन नगरसेवक अजय भोसले निवडणूक प्रचारासाठी जात असताना कोरेगाव पार्क येथे त्यांच्या कारवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याच अनिल भोसलेंशी एबीपी माझाने संवाद साधला. सध्या अनिल भोसले शिंदेंच्या शिवसेनेत सहसंपर्कप्रमुख आहेत. अनिल भोसले यांनी सांगितले की, 2009 मध्ये वडगावशेरीमधून आमदारकीसाठी उभे होतो. राम अग्रवाल यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यावेळी छोटा राजनचे अनेक फोन दोन भावांच्या भांडणातून माझ्याकडे येत होते. हजारो कोटींचा हा वाद होता. राम अग्रवाल एसके अग्रवालला पैसे देत नव्हता. एसके अग्रवालने छोटा राजनला राम अग्रवाल हा अनिल भोसले खास मित्र असल्याचे सांगितले होते. त्यातून माझी सुपारी देण्यात आली गोळीबार करण्यात आला. माझ्यावर जर्मनी बेकरीजवळ माझ्यावर गोळीबार झाला. 


अजूनपर्यंत त्यांना कोणीच अटक केली नाही


आरोपी एक वर्षांनी पकडले गेल्यानंतर सुपारीचा उलघडा झाल्याचे अनिल भोसले यांनी सांगितले. छोटा राजनशी निगडीत केसेस सीबीआयकडे त्याठिकाणी आमच्या साक्ष नोंदवली गेल्याचे ते म्हणाले. त्याठिकाणी सुरेंद्रकुमारला अटक व्हायला हवी होती, पण अजूनपर्यंत त्यांना कोणीच अटक केली नाही. पोलिसांकडे मोठी अफरातफर करून प्रकरण दाबायचे हा त्यांचा धंदा असल्याचे ते म्हणाले. गोळीबार प्रकरणात छोटा राजनसह गोळी चालवणाऱ्या यूपीतील साकेतवर गुन्हा दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात सुरेंद्रकुमारसह 8 आरोपी आहेत. सुरेंद्रकुमारला आयपी वागणूक दिली जाते.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Agarwal Chhota Rajan Special Report : नवा बॉम्ब, राजनशी संबंध; अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्लड कनेक्शन!

TRENDING VIDEOS

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय7 Hour ago

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report9 Hour ago

Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report10 Hour ago

Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!10 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.