Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
काल झालेल्या विधानसभा मतमोजणीत सर्वात धक्कादायक निकाल होता तो तामिळनाडूचा... अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अभिनेता विजय यांच्या पक्षानं सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार केलाय... मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पराभव स्वीकारून पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विजय यांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात... या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट म्हणजे तामिळनाडूच्या राजकीय पटलावर अवतरलेला एक नवा सिनेस्टार... या दाक्षिणात्य राज्याला याची मोठी परंपराही आहे... अण्णादुराई यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास थलापती विजय यांच्यापर्यंत येऊन पोहोचलाय...
पडद्यावरचा ‘हिरो’ आधी जनतेच्या मनात घर करतो...
आणि मग राजकारणात प्रवेश करतो अन् थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत धडक देतो...
दक्षिण भारतात... त्यातही तामिळनाडूच्या राजकारणाची ही दीर्घ परंपरा...
या परंपरेची सुरुवात झाली सी. एन. अण्णादुराई यांच्यापासून…
नाटकं, संवाद आणि सिनेमाच्या माध्यमातून
द्रविड विचारसरणी जनतेपर्यंत पोहोचवणारे प्रेक्षकांचे 'अण्णा'...
१९४९ साली अण्णादुराई यांनी 'द्रविड मुन्नेत्र कळघम' या पक्षाची स्थापना केली अन् राजकारणात दमदार प्रवेश केला...
१९६७ साली त्यांनी पक्षाला विजयपथावर नेलं अन् 'कॉलिवूड'मधून मुख्यमंत्री कार्यालयात जाणारे ते पहिले अभिनेते ठरले...
पुढली अनेक दशकं राज्याच्या राजकारणावर पकड असलेल्या एम.जी. रामचंद्रन आणि एम. करुणानिधी यांची राजकीय जडणघडण अण्णांच्याच तालमित झाली हे विशेष...
अण्णादुराई यांच्यानंतर द्रविडी राजकारणात भक्कम पाय रोवलेले अभिनेते म्हणजे एम. जी. रामचंद्रन... किंवा एमजीआर...
गरीबांचा तारणहार, अन्यायाविरोधात लढणारा नायक ही रुपेरी पडद्यावरची भूमिका एमजीआर यांना राजकारणात हात देऊन गेली...
अण्णादुराई यांच्या हाताखाली राजकारणाचे धडे गिरवल्यानंतर एमजीआर यांनी पक्षात पहिली मोठी फूट पाडली...
अन् १९५३ साली तामिळनाडूच्या राजकारणाचा दुसरा अक्ष.. ऑल इंडिया अण्णा डीएमके पक्ष अस्तित्वात आला...
सिनेमामुळे लाभलेली प्रसिद्धी आणि डीएमकेतून फुटलेली संघटना या जोरावर १९७२ साली एमजीआर तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले...
All Shows































