✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Vijay Rupani Death : विमान अपघातात मृत्यू, कोण आहेत विजय रुपाणी? Special Report

जयदीप मेढे  |  12 Jun 2025 11:58 PM (IST)
ABP News

Vijay Rupani Death : विमान अपघातात मृत्यू, कोण आहेत विजय रुपाणी? Special Report    अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांनी या घटनेनं संपूर्ण देश स्तब्ध आहे, असं म्हटलं. संपूर्ण देश एकसाथ आणि संवेदनांसह दुर्भाग्यपूर्ण दुर्घटनेत ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. अमित शाह म्हणाले की, भारत सरकार, गुजरात सरकार, भारताचे पंतप्रधान यांच्यावतीनं ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो.   बचावलेल्या प्रवाशाला भेटलो : अमित शाह  अमित शाह म्हणाले, अपघातानंतर 10 मिनिटात भारत सरकारला माहिती मिळाली. तातडीनं मी मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहविभागाचे नियंत्रण कक्ष, नागरी उड्डयण मंंत्री, नागरी उड्डयण विभाग सर्वांसोबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन लगेच आला होता, असं अमित शाह यांनी सांगितलं.  भारत सरकार, गुजरात सरकार आणि सर्व विभाग मदत कार्य आणि बचाव कार्य करत आहेत. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. यापैकी एक प्रवाशी वाचल्याची माहिती समोर आली आहे. त्याला भेटून आलो आहे. मृत्यूंची संख्या डीएनए परिक्षण आणि प्रवाशांची ओळख पटवल्यानंतर प्रशासन अधिकृत पणे जाहीर करेल, अशी माहिती देखील अमित शाह यांनी दिली.          कुणालाही वाचवण्याची संधीचं मिळाली नाही  घटनेनंतर तातडीनं गुजरात सरकारनं आपत्ती व्यवस्थापनांच्या सर्व विभागांना अलर्ट केलं.  आरोग्य विभाग, फायर ब्रिगेड, पोलीस विभाग असो भारत सरकारच्या सीएपीएफला संपर्क करुन सर्वांनी एकत्र मिळून मदत कार्य आणि बचाव कार्य केलं. सव्वा लाख लिटर इंधन विमानात होतं. तापमान इतकं वाढलं की कुणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही. मी घटनास्थळावर जाऊन आलो आहे, असंही अमित शाह यांनी सांगितलं.   सर्व प्रवाशांच्या मृतदेहाला बाहेर काढण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. ज्या प्रवाशांचे नातेवाईक इथं पोहोचले आहेत त्यांचे डीएनए घेण्याचं काम दोन तीन तासात पूर्ण होईल. विदेशात ज्यांचे नातेवाईक आहेत त्यांना माहिती देण्याचं काम झालं आहे. ते जेव्हा पोहोचतील तेव्हा डीएनए घेतले जातील, असं अमित शाह म्हणाले. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Vijay Rupani Death : विमान अपघातात मृत्यू, कोण आहेत विजय रुपाणी? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.