Nagpur MLA Photo Session Special Report : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर फोटोसेशन, आदित्य ठाकरे बाजूला?
abp majha web team | 15 Dec 2023 07:32 AM (IST)

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदारांचं फोटोसेशन पार पडलं. आदित्य ठाकरे मात्र फोटोसेशनमध्ये नव्हते. आदित्य मुंबईहून येत असल्यानं ते फोटोसेशनला नव्हते असं ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं. मात्र वास्तव वेगळंच आहे. एबीपी माझाकडे असलेल्या दृश्यांनुसार आदित्य ठाकरे पायऱ्यांजवळ होते.. मात्र फोटोसेशन सुरू होण्याच्या काही मिनिटं आधी ते तिथून निघून गेले. घटनाबाह्य सरकारसोबत मला बसायचं नव्हतं, म्हणून मी थांबलो नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली