Vidhan Sabha Special Report : विधान सभेच्या लॉबिंगला कोरोनाचा ब्रेक, नेत्यांना वेगळीच चिंता!
abp majha web team | 06 Jun 2022 11:04 PM (IST)

राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे.. आणि त्यानं विधानपरिषदेकडे डोळे लावून बसलेल्या नेत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे... तुम्ही म्हणाल आता विधान परिषदेच्या आमदारकीत कोरोनाचा काय अडसर, तर अडसर हा आहे की भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांना कोरोनानं पछाडलंय..आणि त्यामुळे विधान परिषदेसाठीचं लॉबिंग पूर्णपणे बंद झालंय... इच्छुकांची पंचाईत झालीय... हातावर हात धरून यादी जाहीर होण्याची वाट बघण्यापलीकडे ते काही करू शकत नाहीयत.