Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report

Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
आता बातमी आहे महाविकास आघाडीत सुरु झालेल्या आणखी एका संभाव्य वादाची. मे महिन्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत मविआचा एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. पण हा उमेदवार नेमका कोण असणार, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. उद्धव ठाकरेंच्या नावावर मविआतील तिन्ही पक्षांचं एकमत असलं तरी उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेवर पुन्हा जायचंय का, या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. त्यामुळं मविआत सध्या जर-तरची भाषा सुरु झालीय. पाहूया, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
जागा एक पण इच्छुक अनेक.
राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीत रंगलेलं राजकारण आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्तानंही सुरु झालंय.
या गोंधळाचं मुख्य कारण आहे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीबाबत असणारा संभ्रम.
उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना निवडून देण्याबाबत मविआत एकमत आहे.
पण अद्याप उद्धव ठाकरेंनी निर्णय जाहीर केला नसल्यामुळं चर्चांना उधाण आलंय.
जर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील, तर आपली भूमिका वेगळी असू शकते, असे संकेत काँग्रेसनं दिलेत.