Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
एकीकडे अशी राजकीय सुंदोपसुंदी सुरू असताना आज एकाच दिवशी दोन चांगल्या घटनाही पाहायला मिळाल्या... शिवसेनेच्या मराठवाड्यातले दोन कट्टर विरोधक नेत्यांनी चक्क एका गाडीतून प्रवास केला अन् आगामी जिल्हा बँकेत महायुतीच्या एकीची हाक दिली... तर दुसरीकडे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी चक्क राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांचा आशीर्वाद घेतला... अर्थात, हा आशीर्वाद राजकीय नव्हता, तर तो होता वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतरचा... बघुयात नकारात्मक राजकारणात दिसलेल्या या सकारात्मकतेवर हा स्पेशल रिपोर्ट...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले शिवसेनेचे दोन आमदार संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार...
जिल्ह्यावर वर्चस्व आणि पक्षातल्या प्रभावावरून या दोघांमधला संघर्ष आपण पाहिलाय...
पालकमंत्री शिरसाट आपल्या सिल्लोड मतदारसंघाला निधी देत नसल्याचा आरोप अलिकडेच सत्तारांनी केला होता...
तर विधान परिषद निवडणुकीत सत्तारांचे पुत्र समीर यांच्या बंडखोरीमुळे हा संघर्ष अधिक चिघळला...
मात्र दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सर्व नेत्यांची एकत्र बैठक घेऊन कान उघाडणी केली...
त्यानंतर शिरसाट आणि सत्तारांमध्ये दिलजमाई झाल्याचं चित्र शुक्रवारी दिसलं...
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा शुक्रवारी वाढदिवस...
त्यामुळे त्यांना शुभेच्छा देणारे फोन येतच होते...
त्यातच राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांचा फोन आला अन् पटोलेंनी चक्क त्यांच्याकडे आशीर्वाद मागितले...
या खास शुभेच्छांवर विचारल्यानंतर पटोले यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यांच्या राजकीय परंपरेचा हवाला दिला...
एका गाडीतून प्रवास करणारे शिरसाट-सत्तार असोत किंवा मग पटेलांचा आशीर्वाद घेणारे नाना पटोले...
स्वपक्षीय असो की विरोधी पक्षात... राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजे काही शत्रू नाही...
आणि गरज पडेल तेव्हा वाद मिटवताही येतात, त्याची ही दोन उदाहरणं...
All Shows
































