Special Report | मनकर्णिका कुंडांतील मौल्यवान खजिना जगासमोर
विजय केसरकर, एबीपी माझा | 09 Mar 2021 10:29 PM (IST)
कोल्हापूर शहराला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. इथल्या प्रत्येक भागात इतिहासाचे अनेक पुरावे दिसून येतात. कोल्हापूरचं अंबाबाई मंदिरही इथल्या वैभवशाली इतिहासाचं प्रतीक आहे. याच मंदिराच्या परिसरातील मनकर्णिका कुंड सध्या चर्चेत आहे. कारण 65 वर्षांपूर्वी बुजवलेल्या मणकर्णिका कुंडात गेल्या वर्षभरापासून उत्खनन सुर आहे.या ऐतिहासिक कुंडात आतापर्यंत साधारण 11 मीटर खोल उत्खनन झालंय. त्यातून अनेक मौल्यवान अशा गोष्टी बाहेर आल्या आहेत. नुकताच उत्खननात एक मोठा खजिना सापडलाय. पाहूयात याचसंदर्भातला आमचा प्रतिनिधी विजय केसरकरचा हा खास रिपोर्ट.