Vaibhav Kadam Special Report : Jitendra Awhad यांच्या बॉडीगार्डने स्वत:ला का संपवलं?
abp majha web team | 29 Mar 2023 11:07 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा तत्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या केलीय... वैभव कदम यांनी तळोजा-निळजे स्टेशन दरम्यान एक्स्प्रेस समोर येऊन आत्महत्या केलीय... आव्हाड यांच्या अनंत करमुसे मारहाण प्रकरणात वैभव कदम आरोपी होते... आणि ठाणे पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू होती, अशी माहिती मिळते.... दरम्यान, कदमने आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.... दुपारी वैभव कदम यांचा मृतदेह ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात आणला गेला... त्यावेळी आव्हाडदेखील रुग्णालयात आले होते... अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल 2020 रोजी आव्हाडांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केले होते... त्यावरून आव्हाड समर्थकांनी करमुसेंना मारहाण केली होती.... या प्रकरणी 14 ऑक्टोबर 2021 रोजी आव्हाडांना अटक झाली होती...