Special Report : वापरलेले मास्क, ग्लोव्हज भरून गाद्यांची विक्री, जळगावमधील धक्कादायक प्रकार
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 12 Apr 2021 09:15 PM (IST)

कोरोनाचा वाढता प्रसार होत असताना वापरलेल्या मास्कचा वापर करीत गादी बनवण्याचा कारखाना गावकऱ्यांच्या जागृततेमुळे वेळीच नष्ट करण्यात यश आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातील कुसुम्बा गाव परिसरात काल वापरल्या गेलेल्या मास्कचा कापसाच्या ऐवजी वापर करून गाद्या बनवल्या जात असल्याचा समोर आले होते,कुसुम्बा गावात महाराष्ट्र गादी भांडार नावाच्या दुकाना समोर मोठ्या प्रमाणावर आणून ठेवले जात असल्याचे कुसुम्बा गावातील नागरिकांच्या लक्षात आले होते.