मविआ मंत्र्यांकडून वसूली सॉफ्टवेअरचा वापर; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
abp majha web team | 16 Oct 2021 10:01 PM (IST)

महाराष्ट्रात सध्या काही नेते सीबीआय, ईडी, आयकरच्या रडारवर आहेत. अनेक ठिकाणी या यंत्रणांची छापेमारीही सुरू आहे... अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी एक गंभीर आरोप केलाय. सरकारमधील काही मंत्र्यांच्या कॉम्प्युटरमध्ये एक सॉफ्टवेअर सापडल्याचा फडणवीसांचा दावा आहे. हे सॉफ्टवेअर कसलं आहे.. आणि त्याची एवढी चर्चा का होतेय पाहुया हा रिपोर्ट