UPSC Results 2022 : यूपीएससी 2022चे निकाल जाहीर, 'यूपीएससी'च्या निकालात महाराष्ट्राचा डंका
abp majha web team | 23 May 2023 10:05 PM (IST)
यूपीएससीचे निकाल जाहीर झालेत...यात इशिता किशोर देशात पहिली आलीये....तर महाराष्ट्रातील उमेदवारांनीही यूपीएससी परीक्षेत जोरदार कामगिरी केलीय.
ठाण्याची २७ वर्षीय कश्मिरा संखे महाराष्ट्रात पहिली आणि देशात २५वी आली आहे. तर संगमनेरच्या मंगेश खिलारीनं देशात ३९६ वा क्रमांक मिळवला आहे. मंगेशने कष्टातून हे यश मिळवलं आहे. त्याची आई शेतमजूर आहे तर वडील संगमनेरमध्ये चहाचा स्टॉल चालवतात. मंगेशच्या यूपीएसी परीक्षेतील यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.