LOC वर Pakistan चं अनधिकृत बांधकाम! पाकिस्तानचंही चीनच्या पावलावर पाऊल?
abp majha web team | 22 Dec 2021 11:54 PM (IST)

भारताला एका बाजूनं चीननं वेढलंय तर दुसऱ्या बाजूनं पाकिस्ताननं. तसं पाहिलं तर भारताच्या सीमेला लागून आणखी काही देशांच्या सीमा आहेत पण ते देश भारताविरोधात आगळीक करीत नाहीत. चीन आणि पाकिस्तान मात्र भारताची कळ काढत असतात. काही महिन्यांपूर्वी चीननं लडाख आणि उत्तराखंडमधील एलएसीवर अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलं होतं. आता पाकिस्ताननंही कूपवाड्यात एलओसीवर अनधिकृत बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. पण भारतीय सैन्यानं कारवाईचा इशारा देताच पाकिस्ताननं बांधकाम थांबवल्याचं समजतंय.