Uddhav Thackeray Prakash Ambedkar Special Report : शिवशक्ती-भीमशक्तीचा नवा प्रयोग दिसणार?
abp majha web team | 03 Nov 2022 12:12 AM (IST)

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांच्या युतीच्या बातम्या चर्चेच्या 'ट्रॅक'वर येण्याची शक्यता. राज्याच्या राजकारणात उद्वव ़ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार? राज्यात 'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या राजकीय प्रयोगाचा दुसरा नवा अंक रंगणार!. प्रकाश आंबेडकरांच्या युतीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंच्या पक्षात चर्चा करीत चाचपणी. या महिन्यात प्रत्यक्ष उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता. 21 नोव्हेंबरला मूंबईत प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरील एका कार्यक्रमात दोघेही एकत्र येण्याची शक्यता. कदाचित त्याआधीही आंबेडकर-ठाकरे भेटीची शक्यता. युतीसंदर्भात ठाकरे आणि आंबेडकरांची दोन ते तिनदा फोनवर चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती.