Thackeray vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' कसं मोडून काढणार उद्धव ठाकरे? Special Report

आता बातमी खासदार संजय राऊतांनी केलेल्या एका गौप्यस्फोटाची...२०१९ मध्ये महाविकास आघाडीत मुख्यमंत्री होण्याची एकनाथ शिंदेंची इच्छा होती, पण ते ज्युनिअर असल्यानं त्यांची संधी हुकली, ज्यांनी दिल्लीत शिंदेंचा सत्कार केला, त्याच शरद पवारांनी आणि अजित पवारांनी शिंदेंच्या नावाला विरोध केला होता, असं त्यांनी सांगितलं, शिवाय भाजपनं शब्द पाळला असता तर शिंदे २०१९मध्येच मुख्यमंत्री झाले असते, असा दावाही संजय राऊतांनी केला.
मुंबईच्या वरळीमध्ये झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात, एकनाथ शिंदेंनी केलेलं वक्तव्य...
शिंदेंच्या दाव्याला प्रतिउत्तर देण्याची जबाबदारी संजय राऊतांनी उचलली
आणि त्यासाठी राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला..
राऊतांच्या दाव्यानुसार २०१९ साली
जर भाजपनं ५०-५० चा फॉर्म्युला मान्य केला असता
तर मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंची पसंती ही शिंदेंनाच होती
जेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार सत्तेत आलं
तेव्हा शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं,
पण ज्यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंचा सत्कार केला
त्य़ाच शरद पवारांनी शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही असा खळबळजनक दावा राऊतांनी केला...