Uddhav-Raj Thackeray Special Report : उद्धव - राज ठाकरेंचे स्मारकाच्या निमित्ताने एकीचे सूर जुळणार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे... एकत्र राहिले... एकत्र शिकले आणि लहानाचे मोठेही एकत्रच झाले... हे सगळं होताना, दोघांनाही मार्गदर्शन करणारा समान धागा म्हणजे बाळासाहेब ठाकरे... शिवसेनेत उद्धव आणि राज ठाकरे जोमानं कामाला लागले होते... आणि अचानक भांड्याला भाडं लागलं... २७ नोव्हेंबर २००५... हा तोच दिवस आहे, ज्यादिवशी ठाकरे घराण्यात पहिली फूट पडली... राज ठाकरेंनी शिवसेना सोडली... तेव्हापासून, सख्खे चुलत भाऊ असलेले हे दोघे पक्के राजकीय वैरीही बनले... गेली १८ वर्षे हा संघर्ष सुरूय... मध्ये कधीतरी दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होतात... आणि थांबतातही... बॅनर लागतात आणि काढलेही जातात... मात्र, आता दोघांच्या एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झालीय, त्याला कारण थोडं वेगळंय... आणि ते कारण आहे... बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक... याच स्मारकाबाबत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.