Udayanraje Bhosale vs Governor Koshyari:राज्यपालांच्या 'आझादी'साठी उदयनराजे 'मैदाना'त Special Report
abp majha web team | 03 Dec 2022 11:32 PM (IST)

भाजप खासदार उदयनराजेंच्या राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याविरोधात पत्रकार परिषदा झाल्या, आंदोलनं झाली, रायगडावर मेळावाही झाला आणि लवकरच आझाद मैदानात पुढील आंदोलनाचा इशाराही देऊन झाला..पण भाजपकडून कोणीच काही बोलायला तयार नाहीये. भाजप नेत्यांनी मौन धारण केल्यामुळे उदयनराजेंचा संताप अनावर होताना दिसतोय.. राजेंनी काल मुंडकं छाटण्याचं तर आज टकमट टोकावरून कडेलोट करण्याचं वक्तव्यही केलंय.. उदयनराजे अधिक आक्रमक होण्याआधी भाजप काही भूमिका घेणार की? राज्यपालांना अभय मिळणार? पाहुयात हा रिपोर्ट