Chandrapur Tiger | वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची अनोखी शक्कल, जवळच्या पिंजऱ्यात बसून वाघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Oct 2020 09:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपूर जिल्ह्यातील RT वन या हल्लेखोर वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने अनोखी शक्कल लावली आहे. वाघावर नजर ठेवण्यासाठी आणि त्याला जेरबंद करण्यासाठी चक्क एका पिंजऱ्यामध्ये वनविभागातील कर्मचाऱ्यांना बसविण्यात आले असून त्यांच्या संध्याकाळी ६ ते सकाळी ८ अश्या ड्युटी लावण्यात आल्या आहेत. मात्र अशा प्रकारे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना का बसविण्यात आले या मागे वेगळंच कारण समोर आलय. RT वन या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने एका पुलाखाली अस्थायी पिंजरा तयार केलाय. राजुरा ते जोगापूर परिसरात असलेल्या एका नाल्यातून हा वाघ अनेक वेळा जातांना दिसलाय त्यामुळे या पुलाखालीच एक अस्थायी पिंजरा तयार करून त्यात हा वाघ अडकेल असा वनविभागाचा प्रयत्न आहे.