Navi Mumbai Tourist : मान्सून अलर्ट असताना पर्यटनाचा मूर्खपणा, डोंगर-धबधब्यावर गेलेले पर्यटक अडकले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसनं धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला. एकीकडे प्रशासनासह मुख्यमंत्र्यांकडूनही गरजेशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पण नागरिकांनी कोरोनासह सर्व नियम धाब्यावर बसवत फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांचा अतिउत्साहीपणा नागरिकांना चांगलाच महागात पडला आहे.
मुसळधार पावसात गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं स्वतः मुख्यमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणांकडूनही सातत्यानं आवाहन केलं जात होतं. पण अशातच काही नागरिकांना त्यांचा अतिउत्साहीपणा चांगलाच भोवला आहे. नागरिकांच्या याच बेफिकीरपणामुळे नवी मुंबईतील काही नागरिक अनेक तास पावसात अडकून पडले होते. नवी मुंबईच्या सीबीडी भागात असलेल्या एका डोंगरातून काल तब्बल 350 जणांची अग्निशमन दलानं सुटका केली आहे. काल रविवारच्या दिवशी काही नागरीक लहान मुलांसह फिरण्यासाठी गेले होते. मात्र मुसळधार पावसानं ओढ्याचं पाणी वाढलं, अन् या पाण्याचा वेग इतका भयंकर होता की, नागरिकांचा परतीचा मार्गच बंद झाला. अखेर या नागरिकांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली. अग्निशमन दलानं या ओढ्यात मानवी साखळी करून तब्बल 350 जणांची सुखरुप सुटका केली आहे. यामध्ये अनेक लहान मुलंही होती. त्यामुळे नागरिकांनो पावसाळा आहे, नसतं धाडस करून धोका ओढवून घेऊ नका, असं आवाहन एबीपी माझाही करत आहे.