कुत्र्याला वाचवताना कालव्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू, व्हनमाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर : सांगली
कुलदीप माने, एबीपी माझा Updated at: 07 Jun 2021 09:53 PM (IST)
आपला आवडता कुत्रा बंधाऱ्यात वाहत्या पाण्यात पडला हे पाहून त्या कुत्र्याला वाचवण्यासाठी तीन भावानी बंधाऱ्यात उडी घेतली. पण पट्टीच्या पोहणाऱ्या या तिघाही भावाना बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही बुडले. सख्या आणि एका चुलत भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झल्याची हृदय हेलावून टाकणारी आटपाडी तालुक्यात घटना घडलीय. वैभव लव्हाजी व्हनमाने हा चुलत भाऊ तर विजय अंकुश व्हनमाने आणि आनंदा अंकुश व्हनमाने अशी बुडालेल्या तीन भावाची नावे आहेत. साखळी बंधाऱ्यात बुडालेल्या या तीन मुलांसाठीचे शोधकार्य संपले असून तिन्ही मुलांच्या बॉडी बंधाऱ्यातच सापडल्या आहेत.