Eknath Khadse : एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंकडून जीवाला धोका, चंद्रकांत पाटील यांचा खळबळजनक आरोप
abp majha web team | 25 Dec 2021 09:09 PM (IST)

राजकारणात आपले वाढते वर्चस्व सहन होत नसल्याने राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या पासून आपल्या विरोधात सतत कट कारस्थान रचले जात असून याच अशाच प्रकारच्या कट कारस्थानं मधून आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो ,आणि अस झालं तर त्याला खडसे परिवार जबाबदार असणार असल्याचा गंभीर आरोप मुक्ताई नगर येथील सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय.