Rajyapal Controversy Special Report : राज्यपालांचे हे पत्र म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण- विरोधक
abp majha web team | 12 Dec 2022 11:55 PM (IST)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आणखी काही महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून आपली भूमिका सविस्तर मांडली आहे. पण विरोधकांनी यावरूनही राज्यपालांना घेरलं आहे.