'स्टेअरिंग आपल्याच हातात, गाडीही चालवतो आणि सरकारही', मुख्यमंत्र्यांचा कुणाला इशारा? Special Report
एबीपी माझा वेब टीम | 18 Jan 2021 11:24 PM (IST)
मी चांगली कार चालवतो की नाही माहीत नाही. पण सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतो आहे. त्यामुळे राज्याचं स्टेअरिंग माझ्या हातात घट्ट आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. ३२ वे राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृहावर झाले. यावेळी ते बोलत होते. मध्ये मध्ये काही खड्डे येत असतात. मात्र, स्टेअरिंगची पकड कमी पडू देणार नाही, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.