Minister's Bungalow Special Report :9 मंत्र्यांचा शपथविधी झाला, बंगले वाटले, दालनं थाटली, पुढे काय?
abp majha web team | 12 Jul 2023 10:55 PM (IST)
राष्ट्रवादीचं धक्कातंत्र झालं, राष्ट्रवादीत फुट पडली, नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला, मंत्र्यांचे सत्कार पार पडले, बंगले वाटले, दालनं थाटली, पण पुढे काय? पुढे फक्त प्रश्नचिन्ह आणि नाराजी. आता झालंय असं... की पेट्रोल भरून, स्टार्टर मारून, ड्रायव्हर दारात तयार आहे... पण जायचं कुठे तेच कोणी सांगत नाहीय.. खातं कुठलं हेच माहीत नसेल तर त्या बंगल्यात जाऊन आणि दालनात बसून हुकूम सोडायचे कोणावर हा सवाल आहे ना... आणि हे कमी म्हणून की काय... दिलेले बंगले आपल्या स्टेटसला न शोभणारे असल्याची नवी तक्रार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केलेय.... त्यामुळे नाराजीनाट्यात आणखी एक भर पडलेय