Mumbai Inflation : दूध, गॅस आणि महागाईचा 'प्रवास' | Special Report ABP Majha

एकीकडे पंतप्रधान मोदींनी सादर केलेले जीडीपीचे आकडे पाहून अनेकांचा ऊर अभिमामानं भरून आला... मात्र दुसरीकडे महागाईमुळे रिकामा झालेला खिसा पाहून अभिमानाची जागा नैराश्यानं घेतली.. सुटं दूध महागलंय... सीएनजी महागलाय... सर्वसामान्यांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागलाय... कोणत्या शहराला महागाईची सर्वाधिक झळ बसतेय... पाहुयात एबीपी माझाच्या प्रतिनिधींचा हा ग्राऊंड झिरो रिपोर्ट....
जे मुंबईकर पिशवीबंद दूधाऐवजी,
प्युअर दूध म्हणून थेट गोठ्यातून येणारं गाई म्हशीचं सूटं दूध वापरतात....
त्यांचा खिसा महिन्यापोटी जवळपास पावणे तीनशे ते तीनशे रूपयांनी जास्त रिकामा होणार आहे...
कारण सुट्या दुधाचे दर प्रति लिटर ९ रूपयांनी वाढलेत
आता या दरवाढीचं कारण सांगताना गोठाचालकांनी कोणकोणती कारणं सांगितलंय तुम्हीच ऐका...
सध्या एफडीकडून भेसळखोरीविरोधात सुरू असलेल्या करवाईमुळे,
ग्राहकांचा सुटं दूध विकत घेण्याकडे कल वाढलाय
मुंबईकरांच्या तुलनेनं पुणेकर नशीबवान म्हणायले हवेत..
कारण तिथे दुधाचे दर तुलनेनं कमी वाढलेत
नागपुरकरांना गाई-म्हशीच्या दुधासाठी आजपासून प्रतिलिटर तीन रूपये जादा मोजावे लागणार आहेत
सकाळी महागलेल्या दुधाचा चहा घेऊन ऑफिससाठी घराबाहेर पडल्यावर मुंबईकरांना प्रवासासाठी देखील जास्त पैसे मोजावे लागणार आहेत
कारण रिक्षाचं किमान भाडे एक रूपयांनी वाढून २७ तर टॅक्सीचं किमान भाडे दोन रूपयांनी वाढून ३३ रूपये झालं आहे...
आता रिक्षा आणि टॅक्सी चालकही काय करणार?
मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये गेल्या चार महिन्यांत सीएनजी प्रति किलो सहा रूपयांनी महागलाय..
त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीय
मुंबईत CNG प्रतिकिलो २ रुपयांनी महागला असून तो ८८ रूपयांवर जाऊन पोहोचलाय..
तर घरगुती PNGच्या दरातही प्रतिकिलो १ रुपयाची वाढ झालीय
परवडणाऱ्या दरात जीवनावश्यक गोष्टी मिळणं हेच सर्वसामान्यांसाठी अच्छे दिन असतात
मात्र दूध, प्रवासासारख्या मूलभूत गोष्टींसाठी खिसा रिकामा करताना सर्वसामान्य आवर्जून विचारतात...कुठे आहेत अच्छे दिन?