PFI Special Report : दक्षिण भारतात दहशतीमागे 'पीएफआय'चा हात? ABP Majha
abp majha web team | 29 Jul 2022 11:16 PM (IST)

काल कर्नाटकात भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्याच्या हत्येत पीएफआय संघटनेचे नाव समोर आले आहे. तसेच नुपूर शर्मा प्रकरणातून अमरावतीत झालेली उमेश कोल्हे यांच्या हत्येत एनआयए ने अमरावतीच्या पीएफआयच्या अध्यक्षाला हि चौकशीसाठी बोलावले आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ इथे देशातल्या अनेक हिंसक घटनांमध्ये, आंदोलनांमध्ये पीएफआयचे नाव सातत्याने समोर आल्याचा दावा तिथल्या सरकार करत आल्या आहेत. आता कर्नाटक सरकार ने खास पीएफआय सारख्या संघटनांवर कडक कारवाई करण्यासाठी एक विशेष कमांडो फोर्स घोषित केला आहे तर महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार अनिल बोन्डे ह्यांनी सुद्धा पीएफआय हे बॅन करावे अशी मागणी केली आहे. काय नक्की आहे हे पीएफआय?