Thackeray Plan B Special Report : राजीनामा लटकला? तर प्लान बी तयार?
abp majha web team | 12 Oct 2022 11:07 PM (IST)
अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यात ही निवडणूक भाजपऐवजी शिंदे गट लढण्याची
शक्यता आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंना भेटल्याची चर्चा आहे. लटके यांना शिंदे गटात वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप माघार घेऊन शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला ही जागा सोडली जाऊ शकते अशी चर्चा आहे.